मुंबईच्या कुलाब्यातील ‘या’ परिसराचा चेहरा मोहरा बदलणार, सौंदर्यीकरणाला सुरूवात
VIDEO | मुंबईच्या कुलाब्यातील 'या' परिसराचा सरकारकडून होणार विकास, कोळी बांधवांच्या पुनर्वसनाला सुरूवात
मुंबई : मुंबईच्या कुलाब्यातील बधवार पार्क परिसराचा सरकारकडून विकास करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर कुलाबा इथल्या बधवार पार्क या परिसरातील कोळी बांधवांच्या पुनर्वसनाला सुरुवात करण्यात आली आहे. इतकेच नाही तर या परिसराच्या सौंदर्यीकरणाला देखील सुरूवात झाली आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी ज्या बुधवार पार्क इथल्या समुद्री मार्गाने दहशतवादी अजमल कसाब हा मुंबईत घुसला आणि दहशत माजवली होती. आता पंधरा वर्षानंतर त्या परिसराचा विकास सुरू झाला आहे. आमदार राहुल नार्वेकर यांनी या परिसराचा पाठपुरावा केला होता त्यानंतर आता यांच्या निधीतून या परिसराचा विकास करण्यात येणार आहे. दरम्यान, इथे बोटी पार्क करण्याची जागा असल्याने सरकारने पर्यायी व्यवस्था करावी अशी इथल्या कोळी बांधवांची मागणी आहे. तर विकासासोबत कोळी बांधवांच्या उपजीविकेचा सुद्धा सरकारने विचार करावा अशीही मागणी केली जातेय, त्यामुळे लवकरच हा परिसर स्वच्छ आणि सुंदर झाल्यानंतर उच्चभ्रू परिसरातील या जागेचा चेहरा मोहरा बदलणार आहे.