‘लाडक्या बहिणी’ची चर्चा असताना दादांनी आठवण दिली ‘लाडक्या लेकी’ची, मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत मिळणार ‘इतके’ रुपये

| Updated on: Aug 09, 2024 | 4:04 PM

राज्य सरकारकडून एक योजना सुरू आहे. या योजनेनुसार एखाद्या घरात मुलीने जन्म घेतला तर ती १८ वर्षाची होईपर्यंत तिला १ लाख १ हजार रुपये टप्प्याने देण्यात येत आहे. यामध्ये २०१३ पासून राज्य सरकारने सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेचा समावेश आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा मोठी प्रतिसाद मिळत आहे. अशातच येत्या १७ ऑगस्टला पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी मोठी अजित पवार यांनी दिली. तर यावेळी मुलींच्या एका योजनेवरही ते बोलले. १ हजार मुलं जन्माला येतात तेव्हा ७०० मुली जन्माला येतात. मुलगी नको.. अशी मानसिकता काही लोकांची झाली आहे. त्यामुळे गर्भलिंग निदान चाचणी बंद केली आहे. ज्याप्रमाणे मुलाला जन्माला यायचा अधिकार आहे तसा लक्ष्मी सारख्या असणाऱ्या मुलीला देखील जन्म घ्यायचा अधिकार आहे, असे म्हणत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलत असताना मुलींसंदर्भातील एका योजनेची माहिती दिली. जर १ कोटी मुलांची संख्या असेल आणि ७० लाख मुली जन्माला येत असेल तर ३० लाख मुलांनी कुठे जायचं.. त्यांनी कुठे जायचं लग्न करायला… हा चेष्ठेचा विषय नसून ही वस्तू स्थिती आहे, असे म्हणत अजित पवार यांनी गंभीर विषयावर बोट ठेवलं आहे.

Published on: Aug 09, 2024 04:04 PM
अररर…. थोडक्यात बचावले; कोल्हे, जयंत पाटील शिवरायांच्या पुतळ्याला हार घालताना झुकली क्रेन अन्.. ; बघा VIDEO
‘त्या’ प्रश्नावरून प्रकाश आंबेडकर पत्रकारावर भडकले; म्हणाले, “या राजकारणातला मी बाप..”