ST Workers Strike | ST कार्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न - सूत्र

ST Workers Strike | ST कार्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न – सूत्र

| Updated on: Nov 18, 2021 | 10:48 PM

कोर्टाचे आदेश आणि एसटीची आर्थिक स्थिती यावरही या बैठकीत चर्चा झाली. यावेळी अनिल परब यांनी चर्चेच्या तोडग्याचा फॉर्म्युला देण्याचं ठरल्याचं सांगितलं जातं.

मुंबई: एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठला. यावेळी त्यांनी फडणवीसांसोबत एसटी कामगारांच्या संपावर चर्चा केली. कोर्टाचे आदेश आणि एसटीची आर्थिक स्थिती यावरही या बैठकीत चर्चा झाली. यावेळी अनिल परब यांनी चर्चेच्या तोडग्याचा फॉर्म्युला देण्याचं ठरल्याचं सांगितलं जातं. पगाराचा मुद्दा कसा सोडवायचा याबाबतच्या काही सूचना फडणवीस यांनी परब यांना दिल्या असून ही बैठक सकारात्मक झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Special Report | बॉलिवूडची बेताल Queen कंगना रनौतची चौफेर कोंडी
Anil Parab | फडणवीसांनी दिलेल्या सूचनांवर आम्ही विचार करू : अनिल परब