Video | महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा – भगतसिंह कोश्यारी
महिला अत्याचार थांबवण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.
मुंबई : शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळ संचालित विधी महाविद्यालयाचे उद्घाटन व एम ए ,एम कॉम, एम एस्सी या पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाच्या इमारतींचा पायाभरणी सोहळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना त्यांनी महिलांचे शिक्षण तसेच त्यांच्या प्रगतीवर भाष्य केले. महिलांना सामाजिक शैक्षणिक कार्यात संधी देण्याजी गरज असल्याचे ते म्हणाल. तसेच महिला अत्याचार थांबवण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.