Special Report | मुंबई महापालिकेतील योजनेची चौकशी होणार !

| Updated on: Jan 02, 2022 | 9:04 PM

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पुन्हा तणाव वाढताना दिसतोय. त्यातच आता मुंबई महापालिकेसंदर्भातल्या एका योजनेवरुन राज्यपालांनी मोठा निर्णय घेतलाय. राज्यपाल कोश्यारींनी थेट मुंबई महापालिकेतील प्रकरण लोकायुक्तांकडे सोपवलंय. त्यामुळं मुंबई महापालिकेवरुन राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना झटका दिल्याची चर्चा आहे.

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पुन्हा तणाव वाढताना दिसतोय. त्यातच आता मुंबई महापालिकेसंदर्भातल्या एका योजनेवरुन राज्यपालांनी मोठा निर्णय घेतलाय. राज्यपाल कोश्यारींनी थेट मुंबई महापालिकेतील प्रकरण लोकायुक्तांकडे सोपवलंय. त्यामुळं मुंबई महापालिकेवरुन राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना झटका दिल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनी लोकायुक्तांना दिलेत. आश्रय योजनेत 1 हजार 844 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचा आहे. आश्रय योजनेद्वारे सफाई कामगारांच्या 39 वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. मात्र या योजनेत घोटाळ्याचा आरोप करुन, भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशीची सूचना केलीय.

Special Report | मंत्री नवाब मलिकांचे ‘फर्जीवाडा’वरुन पुन्हा गंभीर आरोप
Special Report | कोरोनाचा संसर्ग वाढला..तरी नियमांचा फज्जा -tv9