सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खदायक – राज्यपाल
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सिंधुताई यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकटे आली, मात्र त्यांनी कधीही हार मानली नाही, जीद्दीने सर्व संकटाचा सामना केला असे ट्विट राज्यपालांनी केले आहे.
मुंबई: सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं पुण्यात दु:खद निधन (Passes Away) झालं आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital) त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सिंधुताई यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकटे आली, मात्र त्यांनी कधीही हार मानली नाही, जीद्दीने सर्व संकटाचा सामना केला असे ट्विट राज्यपालांनी केले आहे.