Nana Patole | हायकोर्टाच्या निर्णयाचं राज्यपालांनी त्वरित पालन करावं : नाना पटोले
माननीय हायकोर्टाने आज जो निर्णय दिला आहे. त्या निर्णयाचं त्वरित पालन राज्यपालांनी करावं. नाही तर पुन्हा दिल्लीचा संदेश येईल आणि नाही तर दिल्लीचा संदेश आल्याशिवाय मी काही करणार नाही, असं वक्तव्य येता कामा नये, याची काळजी माननीय राज्यपाल महोदयांनी घ्यावी, असे नाना पटोले म्हणाले.
वर्धा : माननीय कॅबिनेटने जो निर्णय घेतला त्या निर्णयात थोडीफार त्रुटी असेल तर ती दुरुस्ती करून त्याला तातडीने मान्यता देणं हे माननीय राज्यपालांच कर्तव्य बनतं. पण नामनियुक्त विधान परिषद सदस्यांची यादी जवळपास एक वर्ष झाली पेंडिंग ठेवून राज्यपालांनी आपल्याकडे ठेवली. ही खऱ्या तर राज्यपालांची असंविधानिक भूमिका राज्यपालांची होती. माननीय हायकोर्टाने आज जो निर्णय दिला आहे. त्या निर्णयाचं त्वरित पालन राज्यपालांनी करावं. नाही तर पुन्हा दिल्लीचा संदेश येईल आणि नाही तर दिल्लीचा संदेश आल्याशिवाय मी काही करणार नाही, असं वक्तव्य येता कामा नये, याची काळजी माननीय राज्यपाल महोदयांनी घ्यावी, असे नाना पटोले म्हणाले.