राज्यपालांचा अमरावती दौरा, आमदार रवी राणांनी घेतली राज्यपालांची भेट
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज अमरावती दौऱ्यावर होते, त्यांच्या या दौऱ्यामध्ये आमदार रवी राणा यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे, त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन राज्यपालांना दिले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज अमरावती दौऱ्यावर होते, त्यांच्या या दौऱ्यामध्ये आमदार रवी राणा यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे, त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन राज्यपालांना दिले. यावेळी बोलताना रवी राणा यांनी सांगितले की, शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका रात्रीत हटवण्यात आला. यामागे मोठे राजकारण आहे. याला माहाविकास आघाडीचे सरकार जबाबदार आहे. याच संदर्भात आपण राज्यपालांची भेट घेतली असून, पुतळा पुन्हा उभारण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्यात याव्यात अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगीतले.