शिवरायांची पंतप्रधान मोदींशी तुलना, गोविंदगिरींच्या ‘त्या’ वादग्रस्त दाव्यानं चर्चांना उधाण
ज्या शिवरायांनी वयाच्या १६ व्या वर्षी शंकराला साक्षी देऊन शपथ घेतली तेच शिवराय त्याच शकंरापुढे संन्यास घेण्याचा विचार कसा काय करणार? अयोध्येतील कार्यक्रमात महाराष्ट्रातील महंत गोविंदगिरी महाराज यांनी केलेली काही विधानं वादात सापडली आहे.
मुंबई, २४ जानेवारी २०२४ : अयोध्येतील कार्यक्रमात महाराष्ट्रातील महंत गोविंदगिरी महाराज यांनी केलेली काही विधानं वादात सापडली आहे. शकंरापुढे छत्रपती शिवाजी महाराज कधीकाळी संन्यास घेण्याच्या विचारात होते, असा नवा दावा गोविंदगिरी यांनी केला आहे. ज्या शिवरायांनी वयाच्या १६ व्या वर्षी शंकराला साक्षी देऊन शपथ घेतली तेच शिवराय त्याच शकंरापुढे संन्यास घेण्याचा विचार कसा काय करणार? असा सवाल सध्या उपस्थित होतोय. तर गोविंदगिरी यांनी केलेल्या विधानावर इतिहासकारांचं मत आहे की, गोविंदगिरींनी दिलेला संदर्भ हा प्रत्यक्षात दिलेल्या प्रसंगापेक्षा वेगळा आहे. सभासदांच्या बखरीतून गोविंदगिरींनी हा संदर्भ दिल्याचे म्हटलेय. त्या बखरीत नेमकं काय म्हटलंय आणि अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाच्या सोहळ्यात गोविंदगिरी यांनी काय म्हटलं? बघा स्पेशल रिपोर्ट
Published on: Jan 24, 2024 12:46 PM