स्वतःच्या हातून गोविंदाला गोळी लागल्यावर रुग्णालयातून शेअर केली ऑडिओ क्लिप, म्हणाला…

| Updated on: Oct 01, 2024 | 11:22 AM

अभिनेता गोविंदाच्या गुडघ्याला गोळी लागल्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज मंगळवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गोविंदाच्या हातातील बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्याकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

अभिनेता गोविंदा याच्या बंदुकीतून गोळी मिसफायर झाल्याची घटना घडली. स्वतःच्या हातून गोळी सुटल्याने गोविंदाच्या गुडघ्याला गंभीर जखम झाली. सध्या त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय. याचदरम्यान गोविंदा याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.‘आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने मी बरा आहे’ असे सांगत गोविंदाने एक ऑडिओ मेसेजने सर्व चाहत्याचे तसेच डॉक्टरांचे आभार मानले. पुढे तो असेही म्हणाला, ‘माझ्या पायाला गोळी लागली होती, पण ती काढण्यात आली आहे. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद, आई-वडिलांचा आशीर्वाद आणि गुरूंच्या कृपेने मी आता बरा आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेने मी आता ठीक आहे. मी इथल्या डॉक्टरांचे मनापासून आभार मानतो. तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेने मी आता ठीक आहे.त्यासाठी धन्यवाद!’ असे म्हणत गोविंदा याने ऑडिओद्वारे सर्वांचे आभार मानले आहेत. दरम्यान, टीव्ही ९ मराठी या ऑडिओची पुष्टी करत नाही.

Published on: Oct 01, 2024 11:22 AM
अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल, स्वतःच्या हातून बंदुकीतून सुटली गोळी अन्…
‘श्रीमंतांची पदं सगळे घेतात, मी गरीब…’, भरत गोगावले नेमकं काय म्हणाले?