गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय? कशी आहे प्रकृती?

| Updated on: Oct 04, 2024 | 3:30 PM

गोविंदाच्या डाव्या पायाच्या हाडाला दुखापत झाली असून आज त्याला डिस्चार्ज मिळाला आहे. पण तरी स्वतःच्या पायावर उभं राहणं त्याला शक्य नाही. पायातील गोळी काढण्यात आली असली तरी पूर्ण बरं होण्यासाठी 3 ते 4 आठवड्यांचा काळ लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले.

बॉलिवूड अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदा यांना मुंबईतील क्रिटीकेअर एशिया रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी अभिनेता गोविंदाच्याच हातून चुकून त्याच्याच रिव्हॉल्वरने पायात गोळी लागली होती. या घटनेनंतर गोविंदाला रूग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर गोविंदावर क्रिटीकेअर रुग्णालयाच उपचार सुरू होते. आज दुपारी एक वाजेच्या सुमारास अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याचं संपूर्ण कुटुंब देखील हजर होतं. डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘अनेक ठिकाणी माझ्यासाठी अनेकांनी देवाकडे पूजा करण्यात आली. माझ्यासाठी अनेकांनी दुवा केल्या त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. माध्यमांचे, पोलिसांचे आणि प्रशासनाचे देखील मी आभार मानतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. विशेषतः माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्यांचे आभार मानतो’, असे गोविंदाने डिस्चार्ज मिळताना प्रतिक्रिया दिली. पुढे असेही म्हणाले की, तुमच्या कृपा आणि आशीर्वादामुळे मी सुरक्षित आहे. तुमच्याकडून मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे… जय माता दी…’ असं गोविंदा म्हणाला आहे.

Published on: Oct 04, 2024 03:30 PM