ST Worker Strike | एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्य सरकार समिती नेमणार
गेल्या 11 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. कामगारांनी संप मागे घेण्यास नकार दिलेला असतानाच एसटी कामगारांचे वकील अॅड. गुणवंत सदावर्ते यांनी मोठं विधान केलं आहे.
मुंबई: गेल्या 11 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. कामगारांनी संप मागे घेण्यास नकार दिलेला असतानाच एसटी कामगारांचे वकील अॅड. गुणवंत सदावर्ते यांनी मोठं विधान केलं आहे. जोपर्यंत राज्य सरकारकडून लिखित आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहणार आहे, असं गुणवंत सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर गुणवंत सदावर्ते यांनी मीडियाशी संवाद साधला. संप मिटवायचा की नाही याबाबत संध्याकाळी निर्णय घेणार आहोत. पण सरकारचा लिखित आदेश वाचल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असं सदावर्ते यांनी सांगितलं. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्य सरकार समिती नेमणार अशी माहिती समोर येत आहे.
Published on: Nov 08, 2021 12:02 PM