आपल्या आमदाराला किती पगार मिळतो, माहितीये का? बघा थेट सॅलरी स्लिप
VIDEO | जुन्या पेन्शनचा मुद्दा चांगलाच तापलेला असताना आमदार-खासदारांनाच जुनी पेन्शन कशी? किती पगार मिळतो अन् किती पेन्शन मिळतं, तुम्हाला माहितीये का?
मुंबई : कर्मचाऱ्यांना नवी पेन्शन आणि आमदार-खासदारांना जुनी पेन्शन का? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय. आमदार-खासदारांची पेन्शन बंद करुन कर्मचाऱ्यांचा पेन्शन खर्च भागणार नसला, तरी दोन्ही जनतेचेच सेवक असतील तर मग पेन्शनमध्ये भेदभाव का? असा प्रश्न राज्यातील संपरकरी कर्मचारी करतायत. महाराष्ट्रातल्या 288 पैकी जवळपास 93 टक्के आमदार करोडपती आहेत. तरी निवृत्तीनंतर आमदारांना दरमहा 50 हजार ते सव्वा लाखांपर्यंत पेन्शनही दिलं जातं. कर्मचाऱ्यांचा आकडा लाखांमध्ये आहे तर आजी-माजी आमदारांची संख्या हजार-दीड हजारांच्या घरात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र तुम्हाला माहितीये का आपल्या आमदाराला किती पगार मिळतो, किती पेन्शन आहे, पगार कसा आणि कुठे विभागला जातो…
Published on: Mar 16, 2023 06:08 PM