‘मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे’, सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या वंशजांची मागणी

| Updated on: Sep 05, 2023 | 11:55 AM

VIDEO | महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे, अशी मागणी सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज नितीन मालुसरे यांनी सांगलीत केली. तर लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी विनंतीही केली

सांगली, ५ सप्टेंबर २०२३ | महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे, अशी मागणी सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज नितीन मालुसरे यांनी केली. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे प्रमुख नितीन चौगुले यांनी आयोजित केलेल्या कावड यात्रेनिमित्त मालुसरे हे सांगलीत आले होते. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि मराठा समाजावर भाष्य करताना त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मागणी केली. तर मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र आरक्षणाची मागणी शांततेच्या मार्गाने असावी. त्याला कोणतेही हिंसक वळण लावू नये. तसेच सरकारनेही लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय द्यावा, असे मतही नितीन मालुसरे यांनी व्यक्त केले.

Published on: Sep 05, 2023 11:55 AM
Rohit Pawar यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा; म्हणाले, ‘… तर राजीनामा दिलाच पाहिजे’
‘Devendra Fadnavis यांना भीती, म्हणून माफी मागितली’, एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?