मुंबईच्या जागांचा फॉर्म्युला ठरला? ६ पैकी ४ जागांवर भाजप तर शिंदेंची शिवसेना किती जागा लढणार?

| Updated on: Jan 18, 2024 | 12:48 PM

महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजप ३२ जागा लढणार असल्याची चर्चा तर नुकताच आगामी निवडणुका तोंडावर असताना मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदेंच्या शिवसेनेसह दक्षिण मुंबईवरून मिलिंद देवरा यांची धाकधूक वाढली असेल.

मुंबई, १८ जानेवारी २०२४ : महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजप ३२ जागा लढणार असल्याची चर्चा आहे तर मुंबईतील जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ असेल, तर मुंबईत भाजप ६ पैकी ४ जागा आणि शिंदेंच्या शिवसेनेला २ दागा देणार अशी माहिती सुत्रांकडून मिळते. तर दुसरीकडे भविष्यात राज्याचा कासरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असेल असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलंय. नुकताच आगामी निवडणुका तोंडावर असताना मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदेंच्या शिवसेनेसह दक्षिण मुंबईवरून मिलिंद देवरा यांची धाकधूक वाढली असेल. अर्थात ज्या जागा जिंकल्या त्या लढणार असं सांगून शिंदेच्या शिवसेनेकडून मंत्री दीपक केसरकर यांनी दक्षिण मुंबई आणि मुंबईत ३ जागांवर दावा केलाय. बघा कोणत्या जागांवर कुणी केला दावा?

Published on: Jan 18, 2024 12:48 PM
अरे बहुत जगह है…अरे नहीं है…. महायुतीच्या नेत्यांची दाटीवाटी अन् विरोधकांकडून टोलेबाजी
खाने का पिने का और झोपने का, दुसरं क्या काम है तिकडं?; मनोज जरांगे पाटील यांचं छप्परफाड हिंदी ऐकलं का?