महायुतीचं ठरलं? लोकसभेसाठी जागावाटप फायनल? ४८ जागांपैकी कुणाला किती जागा?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही नेत्यांनी अधिकृतपणे आपली भूमिका व्यक्त केली नाही. महायुतीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाटपाचं गणित ठरल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अपेक्षेप्रमाणे भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटात भाजपचं मोठा भाऊ राहणार आहे.
मुंबई, १७ जानेवारी २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही नेत्यांनी अधिकृतपणे आपली भूमिका व्यक्त केली नाही. तर सुत्रांच्या माहितीनुसार जो फॉर्म्युला समोर आलाय. जवळपास त्यानुसारच महायुतीच्या जागावाटपचं सूत्र असेल. महायुतीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाटपाचं गणित ठरल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अपेक्षेप्रमाणे भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटात भाजपचं मोठा भाऊ राहणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये राज्यातील लोकसभा जागांचा आढावा घेतला गेला. त्यानुसार लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजप ३२, शिंदेंची शिवसेना १० आणि अजित पवार गट ०६ जागा मिळणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…