मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक

| Updated on: May 09, 2024 | 3:56 PM

मनोज जरांगे पाटील यांची 100 एकर परिसरात भव्य सभा होणार आहे. 100 एकरावर या संवाद बैठकीचे नियोजन करण्यात आलं असून 50 एकरावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह एक हजार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली. तर 15 डॉक्टरांची टीम आपत्कालीन व्यवस्थेसाठी ठेवण्यात आली.

Follow us on

मनोज जरांगे पाटील यांची नारायण गडावर तब्बल 100 एकर परिसरात भव्य सभा होणार आहे. 8 जून रोजी बीडच्या नारायण गड या ठिकाणी गरजवंत मराठ्यांची महासभा होणार आहे. त्यासाठी सभेची जोरदार तयारीही गेल्या महिन्यापासूनच सुरू झालेली आहे. दरम्यान, या सभेच्या नियोजनासंदर्भात आष्टी तालुक्यातील अंभोरा आणि वाघुळ या दोन गावादरम्यान संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आलंय. 100 एकरावर या संवाद बैठकीचे नियोजन करण्यात आलं असून 50 एकरावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह एक हजार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली. तर 15 डॉक्टरांची टीम आपत्कालीन व्यवस्थेसाठी ठेवण्यात आली. एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना मनोज जरांगे पाटील यांची ही संवाद बैठक महत्त्वाची मानली जाते आहे. सायंकाळी सहा वाजता या संवाद बैठकीला सुरुवात होणार आहे.