‘तिकडे’ जाऊ नये म्हणून शिवसेनेकडून मोठी काळजी!
उध्दव ठाकरे यांचे समर्थक शिवसैनिक हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होवू नये म्हणून जळगावात शिवसेनेकडून मोठी काळजी घेतली जात आहे.
जळगाव: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना दोन गटात विभागली असून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातही याचा परिणाम पहायला मिळत आहे. अनेक खासदार, आमदार आणि पदाधिकारी हे शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण, दुसरीकडे, निष्ठावंत शिवसैनिक (Shivsainik) अजूनही सेनेतच आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जळगावात मोठ्या प्रमाणात 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर (Stamp Paper) शपथपत्र लिहून घेतले जात आहे. उध्दव ठाकरे यांचे समर्थक शिवसैनिक हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होवू नये म्हणून जळगावात शिवसेनेकडून मोठी काळजी घेतली जात आहे.
Published on: Jul 17, 2022 11:35 AM