लग्न वेळेवरच लावायचं, पूराच्या पाण्यात थर्माकॉलवर बसून नवरदेव निघाला
नांदेडमध्ये पावसामुळे रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे. रस्ता पाण्याखाली गेल्याने, काही ठिकाणी बंद असल्याने नवरदेवाने चक्क पाण्यातूनच वाट काढली आहे. पाण्यात थर्माकॉलवर बसून नवरदेवाने प्रवास केला आहे.
नांदेडमध्ये पावसामुळे रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे. रस्ता पाण्याखाली गेल्याने, काही ठिकाणी बंद असल्याने नवरदेवाने चक्क पाण्यातूनच वाट काढली आहे. पाण्यात थर्माकॉलवर बसून नवरदेवाने प्रवास केला आहे. करोडी ते चिंचोली संगम असा सात किलोमीटरचा हा प्रवास पाण्यात थर्माकॉलवर बसून करण्यात आला आहे. राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. गावातील अनेक रस्ते पुराच्या पाण्याखाली वाहून गेले आहेत. अशा परिस्थितीत ठरलेलं लग्न वेळेवर करण्याचा आग्रह धरलेल्या नवरदेवाने अखेर पुराच्या पाण्यातून असा प्रवास केला आहे.
Published on: Jul 15, 2022 12:56 PM