पुण्यात मनसेचं खळखट्ट्याक! वाघोलीतल्या GSPM शाळेत तोडफोड, पण कारण काय?

| Updated on: Feb 19, 2024 | 5:42 PM

पुण्यातील वाघोलीतील एका शाळेची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मनसेकडून वाघोलीच्या जीएसपीएम शाळेमध्ये ही तोडफोड करण्यात आली. मनसे आपलं खळखट्ट्याक आंदोलनाप्रमाणे वाघोलीच्या जीएसपीएम शाळेमध्ये ही तोडफोड केल्याचे सांगितले जात आहे.

पुणे, १९ फेब्रुवारी २०२४ : पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील वाघोलीतील एका शाळेची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मनसेकडून वाघोलीच्या जीएसपीएम शाळेमध्ये ही तोडफोड करण्यात आली. मनसे आपलं खळखट्ट्याक आंदोलनाप्रमाणे वाघोलीच्या जीएसपीएम शाळेमध्ये ही तोडफोड केल्याचे सांगितले जात आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याना परीक्षेचे हॉल तिकीट नाकारल्याने मनसेकडून हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तर ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थी आणि पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्याकडून वाघोलीच्या जीएसपीएम शाळा कॉलेजच्या कार्यालयाची मोठी तोडफोड करण्यात आली. दरम्यान, शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्याना परीक्षेचे हॉल तिकीट न दिल्याचा आरोप या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.

Published on: Feb 19, 2024 05:42 PM
होऊ दे चर्चा… पवारांची साथ सोडत भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर जयंत पाटील यांनी सोडलं मौन
हाताला काहीच लागणार नाही, विशेष अधिवेशनावर राज ठाकरे यांचं भाष्य; तर मनोज जरांगे म्हणाताय…