Pankaja Munde यांच्या अडचणीत वाढ, वैद्यनाथ साखर कारखान्याला कुणाची नोटीस? काय आहे प्रकरण?

| Updated on: Sep 25, 2023 | 1:23 PM

VIDEO | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती यात्रेनंतर महाराष्ट्रातील राजकारणात कमबॅक करण्याची शक्यता असताना पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढणार? वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाची नोटीस

Follow us on

बीड, २५ सप्टेंबर २०२३ | भाजप नेत्या पंकजा मुंंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने सहा महिन्यांपूर्वी धाड टाकत काही कागदपत्रे तपासले होते. यामध्ये या कारखान्याने 19 कोटी रुपयांचा बेकायदेशीर जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी आयुक्तालयाने कारखान्यास नोटीस दिली आहे.  मात्र या अगोदरच युनियन बँकेने मालमत्ता सिल केली आहे. युनियन बँकेचे कारखान्यावर 1200 कोटी रुपयांचे कर्ज आहे. याआधीही केंद्रीय जीएसटी आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी कराबाबत नोटीसा दिल्या होत्या. या नोटिसींना उत्तर न दिल्याने सहा महिन्यांपूर्वी काही अधिकार्‍यांनी या कारखान्याला अचानक भेट देऊन काही कागदपत्रे ताब्यात घेतले होते. त्यामध्ये या कारखान्याने बेकायदेशीररित्या 19 कोटींचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाल्याने शनिवारी कारखान्याला यासंदर्भात पुन्हा नोटीस बजावली आहे