तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.. तुमच्या खिशाला बसणार कात्री
कोल्डड्रिंक्स, सिगारेट, तंबाखू यांच्यासह एकूण १४८ वस्तूंच्या दरात वाढ होणार असल्याची शक्यता आहे. जीएसटी काऊन्सिलच्या २१ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे.
कोल्डड्रिंक्स, सिगारेट, तंबाखूवर आता ३५ टक्के जीएसटी कर लागणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. जीएसटी कराचा दर २८ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. कोल्डड्रिंक्स, सिगारेट, तंबाखू यांच्यासह एकूण १४८ वस्तूंच्या दरात वाढ होणार असल्याची शक्यता आहे. जीएसटी काऊन्सिलच्या २१ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेमध्ये राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा देखील समावेश असणार आहे. तर या बैठकीत जीएसटी दरातील बदलाबाबत काऊन्सिल अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. बिहारचे उप-मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाने कपड्यांवरील कर दर तर्कसंगत करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत, २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या GST काऊन्सिलच्या बैठकीत मंत्री गटाच्या अहवालावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, आता मंत्री गट या आठवड्यात जीएसटी परिषदेला अहवाल सादर करणार असून GST परिषद २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत दरांच्या तर्कसंगती करण्याबाबत मंत्रिगटाच्या अहवालावर चर्चा करण्यात येणार आहे.