पुण्यात दादांविरूद्ध ताईंमध्ये सामना? पुण्याचे कारभारी बदललेत त्यामुळं… सुप्रिया सुळे यांचं अजित पवार यांना आव्हान?
tv9 Marathi Special Report | पुण्यात यापुढे सुप्रिया सुळे ताई विरुद्ध अजित पवार (दादा) असा राजकीय सामना पाहायला मिळू शकतो. पुण्याचे कारभारी बदललेत त्यामुळं मलाही पुण्यात काम करावं लागेल, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अप्रत्यक्षपणे अजित दादांनाच आव्हान दिलंय.
मुंबई, १७ ऑक्टोबर २०२३ | पुण्यात यापुढे ताई विरुद्ध दादा असा राजकीय सामना पाहायला मिळू शकतो. पुण्याचे कारभारी बदललेत त्यामुळं मलाही पुण्यात काम करावं लागेल, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अप्रत्यक्षपणे अजित दादांनाच आव्हान दिलंय. पुण्याचे कारभारी बदललेत म्हणजे याआधी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते आणि आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार झालेत. त्यामुळं दादा पालकमंत्री होताच, सुप्रिया ताईंनीही आपल्यालाही आता पुण्यात काम करावं लागेल असं म्हटलंय. राष्ट्रवादीत, दादांच्या बंडामुळं उभी फूट पडली. आधी अजित दादांचंच पुण्यात अधिक लक्ष असायचं. सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार असल्यानं आणि दादा पुण्याचेच पालकमंत्री राहत असल्यानं, पक्ष म्हणून दादांकडेच पुण्याची जबाबदारी होती मात्र आता पुण्यातही अजित दादांचा गट वेगळा आणि शरद पवारांचा गट वेगळा अशी स्थिती आहे. सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ रोहित पवारांनीही अजित पवारांना डिवचलंय. सत्ताधाऱ्यांकडून स्वत:च्याच आमदारांचं सक्षमीकरण सुरु आहे. त्यामुळं सक्रीय व्हावंच लागेल असं रोहित पवारही म्हणालेत. बघा कोणी काय मांडली भूमिका?