संदीपान भुमरे यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार; म्हणाले, ‘स्वतःचं पाप…’

| Updated on: Apr 13, 2023 | 5:20 PM

VIDEO | 'मातोश्रीवर जाऊन एकनाथ शिंदे यांचा रडण्याचा काहीही संबंध नाही तर...', काय दिलं संदीपान भुमरे यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर

संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अटकेला घाबरले होते. मातोश्रीवर येऊन ते रडत होते. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती करत होते, असं विधान उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली. त्यांच्या या दाव्यावरून राजकारणात एकच आरोप प्रत्यारोप सुरू आहे. अशातच संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रडणारे नाही तर लढणारे नेते आहेत असे म्हणत त्यांनी स्वतःचे पाप झाकण्यासाठी आदित्य ठाकरे हे शिंदे यांच्यावर आरोप करत असल्याचे म्हटले आहे. शिंदे यांनी मातोश्रीवर जाऊन रडण्याचा काहीही संबंध नाही. आदित्य ठाकरे अडीच वर्षे मंत्री होते पण एकही ठिकाणी जाऊन उद्घाटन केलं नाही. त्यावेळी त्यांचं निष्क्रिय सरकार होतं. पण आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस नऊ महिने इतकी कामं केली आहेत. जेवढी मागील अडीच वर्षात झाली नाहीत. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्याकडे आरोप, टीका करण्याशिवाय काही काम उरलेलं नाही अशी टीका भुमरे यांनी केली आहे.

Published on: Apr 13, 2023 05:15 PM
‘चंद्रकांत पाटील पुण्यात आलेले पाहुणे? त्यांना किती दिवस ठेवायचं…’, कुणाची खोचक टीका
एकीकडे अवकाळी पावसाचं थैमान; मात्र ‘या’ जिल्ह्यात उन्हाचा तडाखा, रस्ते सुनसान