Gudhi Padva : राज्यात गुढीपाडव्याचा उत्साह, ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचं स्वागत
आज राज्यभरात ठिकठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. ढोल ताशांच्या गजरात गुढीपाडव्याचा उत्साह साजरा केला जातोय. तर विविध ठिकाणी बच्चे कंपन्यांनी वेगवेगळी वेशभूषा साकारल्याचं दिसून येतंय. कोरोना निर्बंधांमुळे दोन वर्ष गुढीपाडवा साजरा करता आला नाही.
मुंबई : आज राज्यभरात (State) ठिकठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त (Gudhi Padva) उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. ढोल ताशांच्या गजरात गुढीपाडव्याचा उत्साह साजरा केला जातोय. तर विविध ठिकाणी बच्चे कंपन्यांनी वेगवेगळी वेशभूषा साकारल्याचं दिसून येतंय. कोरोना निर्बंधांमुळे दोन वर्ष गुढीपाडवा साजरा करता आला नाही. मात्र यंदा कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारे वेगळाच उत्साह दिसून येत आहे.
Published on: Apr 02, 2022 01:09 PM