गुजरातमध्ये बघता बघता कार नाल्यात वाहून गेली, दृश्यं कॅमेरात कैद

| Updated on: Jul 26, 2021 | 10:34 AM

गुजरातमधील राजकोटमध्ये अशीच भीषण स्थिती पाहायला मिळाली. पाणी साचल्यामुळे मोरबी रोड नाल्यात कार वाहून गेली. सुदैवाने कारमधील दोघा प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. गुजरात राज्यालाही पावसाचा जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनंही नादुरुस्त झाली आहेत. गुजरातमधील राजकोटमध्ये अशीच भीषण स्थिती पाहायला मिळाली. पाणी साचल्यामुळे मोरबी रोड नाल्यात कार वाहून गेली. सुदैवाने कारमधील दोघा प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. ही दृश्यं कॅमेरात कैद झाली आहेत

त्र्यंबकेश्वर, पाहिने, भावलीमध्ये पर्यटकांची गर्दी, नागरिकांना कोरोना नियमांचा विसर
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 9 AM | 26 July 2021