राज ठाकरे यांच्या विचारांवर महाराष्ट्र चालणार? गुलाबराव पाटील यांनी काय लगावला टोला?

| Updated on: Jan 07, 2024 | 12:41 PM

ज्यांनी विचारांना तिलांजली दिली असेल त्यांना ...राज ठाकरे जे बोलले असतील ते लागू होईल. 35 वर्ष भगवा झेंडा आणि शिवसेना पक्षासाठी काम केलं, ते विचार आम्ही सोडले नाही. ३५ वर्षांत आम्ही लाचार झालो नाही तर आता काय लाचार होणार, असं प्रत्युत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर दिलं आहे.

जळगाव, ७ जानेवारी २०२४ :  सध्याचे नेते मिंधे, लाचार आणि पैशांसाठी वेडे झाल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट उत्तर दिले आहे. ज्यांनी विचारांना तिलांजली दिली असेल त्यांना …राज ठाकरे जे बोलले असतील ते लागू होईल. 35 वर्ष भगवा झेंडा आणि शिवसेना पक्षासाठी काम केलं, ते विचार आम्ही सोडले नाही. ३५ वर्षांत आम्ही लाचार झालो नाही तर आता काय लाचार होणार, असं प्रत्युत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर दिलं आहे. आमच्या पक्षातून बाहेर पडण्यावर राज ठाकरे बोलले असतील तर आम्ही भगव्या झेंड्यासाठी बाहेर पडलो पण आम्ही विचार सोडले नाही. ज्यांनी विचार सोडले असतील त्यांना राज ठाकरे जे बोलले असतील ते लागू होईल, असे स्पष्टपणे गुलाबराव पाटील म्हणाले. तर सध्या सुरू असलेल्या राजकारणामुळे विदर्भ आणि महाराष्ट्राचे तुकडे होतील, असं राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, राज ठाकरे जे बोलले हे त्यांचे विचार आहेत या विचारावर महाराष्ट्र चालेल का? हे मला माहीत नाही.. असा प्रश्न उपस्थित करत गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांना टोलाही लगावला आहे.

Published on: Jan 07, 2024 12:41 PM
‘या’ मराठी अभिनेत्याची राजकारणात एन्ट्री, मातोश्रीवर हाती शिवबंधन बांधून करणार पक्षप्रवेश
अजित पवार भाजपच्या कमळावर लढणार? ‘त्या’ वक्तव्यावर अजितदादांकडून रोहित पवार यांचा बच्चा उल्लेख, म्हणाले…