रस्त्याची तुलना हेमा मालिनींच्या गालांशी; गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची दरेकरांची मागणी

| Updated on: Dec 19, 2021 | 1:56 PM

महाराष्ट्रात सध्या नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना बोदवड नगरपंचायतीच्या प्रचारसभेत डिवचलं आहे.

जळगाव : महाराष्ट्रात सध्या नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना बोदवड नगरपंचायतीच्या प्रचारसभेत डिवचलं आहे. माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणूक प्राचारात विरोधकावर जोरदार टीका केली. माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते मी केले. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, अशी टीका पाटलांनी खडसेंवर केली आहे. दरम्यान हेमा मालिनींच्या गालाची तुलना रस्त्याशी केल्याबद्दल गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

Published on: Dec 19, 2021 01:48 PM
पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; प्रवाशांचे हाल
निवडणूक आल्यानंतर ऊसतोड कामगार आठवतात; धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला