गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यानं महायुतीत नवं वादंग तर ‘मविआ’ नेत्यांकडून समर्थन

| Updated on: Sep 08, 2024 | 10:51 AM

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे नेते गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्याने वाद निर्माण झालंय. गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना अर्थखात्याला नालायक म्हटलंय. दरम्यान, या वक्तव्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे दिसतंय.

एकनाथ शिंदे यांचे नेते गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्यानंतर महायुतीत पुन्हा एकदा वादंग निर्माण झालंय. गुलाबराव पाटील यांनी अर्थखात्याबद्दल काढलेल्या एका वक्तव्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. अर्थखातं नालायक असल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील जोरदार उत्तर दिलंय. गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यानंतर महायुतीत कोणतंही समन्वय नसल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. त्यामुळे गुलाबराव पाटलांचा रोख नेमका कुणावर होता? याबद्दल खुलासा करावा, अशी मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय. गुलाबराव पाटील जे म्हणाले ते खरं असल्याचे दानवे म्हणाले तर मविआच्या काळात आम्ही अजित पवारांची तक्रार आम्ही केली होती, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

Published on: Sep 08, 2024 10:51 AM
लूट, स्वारी अन् आता ‘खंडणी’, जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार
Maharashtra Weather : आज अन् उद्या धुव्वाधार, राज्यातील ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा; काय सांगतंय हवामान खातं?