शायरीतून गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर जहरी टीका
शिवसेनेचे बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुवाहाटीतील बैठकीत संजय राऊतांना शायरीतून टोला लगावला आहे.
शिवसेनेचे बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुवाहाटीतील बैठकीत संजय राऊतांना शायरीतून टोला लगावला आहे. ‘आदमी टूट जाता है घर बनाने मे, तुम तरस खाते नहीं बस्ती जलाने मे, कुछ लगता नही दुष्मनी बढाने मे, उम्र बीत जाती है दोस्ती निभाने मे, दोस्तो, रहने दो छोडो, दोस्ती निभाते क्यूँ हो? जवां होकर तुम्हे भी डसने ना राऊतजी , साप के बच्चे को दूध पिलाते क्यूँ हो?,’ अशी शायरी त्यांनी बोलून दाखवताच उपस्थित आमदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका केली. “त्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांनी आम्हाला 52 आमदारांनाही सोडलं, पण ते काही शरद पवारांना सोडायला तयारी नाहीत,” असं ते म्हणाले.