जरांगे यांच्या हिशोबाने कायदा करणं म्हणजे… गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबोल काय?

| Updated on: Feb 19, 2024 | 6:50 PM

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी यावर भाष्य केले आहे. सरकारने विधानसभेत हा कायदा मंजूर करताच पुढच्या काही तासांमध्ये आपण या कायद्याला कोर्टात आव्हान देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. तर जरांगेंच्या हिशोबाने कायदा करणे चुकीचे आहे कारण....

मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४ : शिंदे सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात उद्या एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात कायदा मंजूर केला जाणार आहे. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी यावर भाष्य केले आहे. सरकारने विधानसभेत हा कायदा मंजूर करताच पुढच्या काही तासांमध्ये आपण या कायद्याला कोर्टात आव्हान देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. तर जरांगेंच्या हिशोबाने कायदा करणे चुकीचे आहे कारण तो जरांगे कायदा नाही, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना डिवचलं आहे. तर सरकारने हा कायदा केला तर परिणाम भोगायला तयार रहा, असा इशाराही सदावर्ते यांनी दिला आहे. ओबीसींच्या बाबतीत कुणबीकरण केले जाऊ शकत नाही, सगेसोयरे कायदा करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली.

Published on: Feb 19, 2024 06:50 PM
मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही… एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांचं मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस यांच्याच नावानं पोलिसांना दम, नितेश राणे यांच्या ‘त्या’ वक्तव्यानं नवा वाद