ताबडतोब रूक जाओ… मनोज जरांगे पाटील यांच्या पायी मोर्च्यावर गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?

| Updated on: Jan 24, 2024 | 5:09 PM

सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली. तर आज न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, जर अर्ज असेल तर या पायी मोर्च्याला काहीच अडचण नाही. पण बेकायदेशीरपणे मुंबईकडे धडकणार असतील तर

मुंबई, २४ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर अंतरवली सराटीत लाठीचार्ज दरम्यान 29 पोलीस जखमी झाले होते. त्याचा दाखला गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून हाय कोर्टात देण्यात आला. यावेळी कोर्टाच्या वकिलांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. मनोज जरांगे पाटील यांच्या पायी मोर्च्याच्या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा, सरकारने या मोर्चावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली. तर आज न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, जर अर्ज असेल तर या पायी मोर्च्याला काहीच अडचण नाही. पण बेकायदेशीरपणे मुंबईकडे धडकणार असतील तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ताबडतोब मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा थांबवायचा आहे कारण कायदा मोठा असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. जरांगे कायद्यापेक्षा मोठा नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 24, 2024 05:09 PM
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते, थेट मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
मोठी बातमी ! पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अपघात, प्रकृतीबाबत अपडेट समोर