जुन्या पेन्शनच्या आंदोलनात गुणरत्न सदावर्ते यांची एन्ट्री, कोर्टात घेतली धाव अन्…

| Updated on: Mar 16, 2023 | 9:03 PM

VIDEO | जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात गुणरत्न सदावर्ते यांची एन्ट्री, कोर्टात याचिका दाखल करत कोणती मांडली भूमिका?

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आक्रमक भूमिका घेणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी आता जुन्या पेन्शन योजनेसंदर्भातील आंदोलनातही एंट्री घेतल्याचे समोर आले आहे. या अंदोलनात गुणरत्न सदावर्ते यांनी आता जुनी पेन्शन योजनेबाबत लढणाऱ्या कर्मचाऱ्यांची बाजू घेतली आहे. राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आरोग्य व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, शिक्षण यंत्रणा कोलमडून पडली आहे. त्यातच राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या काळात अशा प्रकारे कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारणं योग्य नाही. त्यामुळे न्यायालयाने तातडीने यात हस्तक्षेप करावा, अशी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सदावर्ते यांची याचिका दाखल करून घेतली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने या आंदोलनाच्या संदर्भात तातडीने सुनावणी घ्यावी अशी विनंती केली आहे तर या प्रकरणाची सुनावणी उद्या ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय होतं याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Published on: Mar 16, 2023 09:02 PM
‘मॅडम चतूर, हिच तुमची औकात’; अमृता फडणवीस आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यात ट्विटर वॉर
तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर शेतकऱ्यांचा निर्धार कायम