मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठ्यांची कूच मुंबईच्या दिशेनं…नेमकं कुठे करणार आंदोलन?

| Updated on: Jan 25, 2024 | 10:30 AM

वकील गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवर सुनावणी झाली आणि जरांगेंना आझाद मैदानाच्या क्षमतेची माहिती देताना नोटीस बजावण्याचे आदेश हायकोर्टांने पोलिसांना दिलेत. पुढच्या काही तासात मनोज जरांगे मराठ्यांचा मोठा ताफा घेऊन मुंबईत येणार आहे.

मुंबई, २५ जानेवारी २०२४ : मराठ्यांसह मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच केले आहे. तर दुसरीकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. सदावर्तेंच्या याचिकेवर सुनावणी झाली आणि जरांगेंना आझाद मैदानाच्या क्षमतेची माहिती देताना नोटीस बजावण्याचे आदेश हायकोर्टांने पोलिसांना दिलेत. पुढच्या काही तासात मनोज जरांगे मराठ्यांचा मोठा ताफा घेऊन मुंबईत येणार आहे. त्याआधीच हायकोर्टाने आझाद मैदान पोलिसांना जरांगेंना नोटीस बजावण्याचे आदेश दिलेत. याचिकाकर्ते म्हणून गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, जरांगेच्या आंदोलनाला परवानगी नसतानाही आंदोलन सुरू आहे. वाहनांसह लाखोंच्या संख्येने लोकं मुंबईकडे येत आहेत. २९ पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. ३०२ सारख्या ३ घडल्या घडल्या अजून कुणाचंही नाव एफायआरमध्ये नाही. मुंबई उच्च न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस द्या, असे गुणरत्न सदावर्ते यांनी दिले आहे.

Published on: Jan 25, 2024 10:30 AM
तब्बल ११ तासांनंतर रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर, अखेर चौकशी संपली
Maratha Reservation : … तर मी गोळ्या झेलायला तयार, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला काय इशारा?