Gunaratna Sadavarte Video : शरद पवारांच्या नावानं बोंब अन् गमसे बाहर निकलो म्हणत सदावर्तेंकडून ठाकरे बंधूंना होळीच्या खोचक शुभेच्छा
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यासह ठाकरे बंधुंना होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा देताना खोचक टीका केली. बघा नेमकं काय म्हणाले?
आज राज्यभरात होळी आणि धुलवडीचा आनंद, उत्साह पाहायला मिळत आहे. या रंगाच्या उत्सवात अनेक राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी एकमेकांना शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यासह ठाकरे बंधुंना धुलीवंदनाच्या खास शुभेच्छा दिल्याचे दिसतंय. गमसे बाहर निकलो, असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे यांना गाण्याच्या माध्यमातून खोचक सल्ला दिला आहे तर टोल टोल टनटनाटन असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील डिवचल्याचे पाहायला मिळाले.
टिव्ही ९ मराठीच्या प्रतिनिधीने उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात गुणरत्न सदावर्ते यांना सवाल केला असता सदावर्ते मोठ्याने हसले आणि म्हणाले, ‘गमसे बाहर निकलो, और होली के दिन एक दुसरों के गले पडो.. मामू और बोलो बुरा न मानो होली है…’ तर शरद पवारांवर वारंवार टीका करणं तसंच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामुळे जेलमध्ये जावं लागलं, असं गुणरत्न सदावर्ते नेहमी म्हणतात त्यांना शुभेच्छा देताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ‘वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या नावाने तर पहिले बोंब मारली पाहिजे. शरद पवार तुम्ही असेच बोंबलत रहा. एक चॅनल संजय राऊत अन् तुमचंही एक चॅनल.. तुमचं इन्टरटेन्मेंट असंच सुरू राहो… आणि महाराष्ट्राची प्रगती होत राहो’, असं म्हणत जिव्हारी लागणारी टीका केली.