Gunratna Sadavarte : … हे शिकून घेतलं पाहिजे उद्धव, गुणरत्न सदावर्ते यांनी केला उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख

| Updated on: Nov 06, 2023 | 12:07 PM

गुणरत्न सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील एसटीचे कर्मचारी स्टॅंडबाय आहेत, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना अरे तुरे ची भाषा केली. 'मला राज्याला सांगायचे आहे की, लोकभिमुख सरकार काय असतं हे उद्धव ठाकरेने शिकून घेतलं पाहिजे'

मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३ | गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटी कष्टकरी जनसंघातील कर्मचारी आजपासून संप पुकारणार असल्याची चर्चा होती. या आंदोलनासाठी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून तयारी सुरू करण्यात आली असताना गुणरत्न सदावर्ते यांनी यासंदर्भात आज शिवेसनेचे नेत आणि मंत्री उदय सामंत यांची या आंदोलनासंदर्भात भेट घेतली असून त्यांच्यात चर्चाही झाली. यापूर्वी माध्यमांशी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील एसटीचे कष्टकरी कर्मचारी स्टॅंडबाय आहेत, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना अरे तुरे ची भाषा वापरल्याचे पाहायला मिळाले. सदावर्ते म्हणाले, मला राज्याला सांगायचे आहे की, लोकभिमुख सरकार काय असतं हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी शिकून घेतलं पाहिजे. आज एसटीचं आंदोलन पुकारणार होतो. पण यापूर्वीच कष्टकऱ्यांना चर्चेला बोलवायचं असतं. हे शिकून घेतलं पाहिजे उद्धव… १२४ मागण्यांसाठी ज्या कष्टकऱ्यांनी वीरमरण पत्कराले होते, त्यांना कधीही चर्चेला बोलवलं नव्हतं. मात्र आंदोलन सुरु होण्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेला बोलवलं असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published on: Nov 06, 2023 12:06 PM
अहमदनगर ग्रामपंचायतींच्या निकालात कोण मारणार बाजी? 16 ग्रामपंचायती बिनविरोध ,178 ग्रामपंचायतींचा कल कोणाकडे?
Sanjay Raut : तुम्ही इतके घाबरले की, इंडियाचं नाव तुम्ही भारत केलंय; संजय राऊत यांचा रोख नेमका कुणावर?