Gunratna Sadavarte यांचा राज ठाकरे यांना इशारा, म्हणाले, ‘आपल्या पिल्लावळांना सांगा…’
VIDEO | गुणरत्न सदावर्ते यांनी शिवाजी पार्क येथील पोलीस ठाण्यात जाऊन राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा, तसेच त्यांना अटक करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे. इतकंत नाहीतर त्यांना धमक्या येत असल्याचे त्यांनी म्हटलं
मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३ | गुणरत्न सदावर्ते यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाऊन राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दिली. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा, तसेच त्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यानंतर मनसे कार्यकर्ते आणि मनसैनिक चांगले आक्रमक झाले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत प्रत्युत्तर देत सडकून टीकाही केली. राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत टोलनाके जाळण्याचा इशारा दिला यावर सदावर्ते यांनी भाष्य करत राज ठाकरे यांना घाबरणार नसल्याचं सांगितलं. तर राज ठाकरे यांची पिल्लावळ मला फोन करून धमकी देत असल्याचे म्हणत मला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशा धमक्या येत असल्याचे म्हटले. पण त्यांना सांगा मी कुणालाही घाबरणार नाही. मी परळ, लालबागमध्ये राहतो त्यामुळे तुमच्या लोकांच्या धमक्यांना भीक घालणार नाही. राज ठाकरे यांची दादागिरी चालणारनाही, असं सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर घणाघात केला.