Gunratna Sadavarte | एसटीचं विलीनीकरण करणार की नाही ते सांगा: गुणरत्न सदावर्ते

| Updated on: Nov 22, 2021 | 5:09 PM

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे. आम्ही समितीसमोर आमची बाजू मांडली असल्याचं अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे. आम्ही समितीसमोर आमची बाजू मांडली असल्याचं अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. आज आम्ही कोणतीही चुकीची घोषणा दिली नसल्याचं सांगितलं. आम्ही अहिंसक पद्धतीनं आंदोलन करत आहोत. एका कष्टकऱ्यानं एसटीवर दगड मारलेला नाही. 40 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या पाहत्या न्यायालयानं आदेश पारीत करावा, असं सांगितल्याचं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. पुढील सुनावणीपूर्वी राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर मार्ग काढण्याचे आदेश दिल्याचं सदावर्ते यांनी सांगितलं.

Published on: Nov 22, 2021 05:07 PM
एसटी कर्मचारी आणि जनतेच्या हितासाठी मध्यम मार्ग काढण्यासंदर्भात शरद पवारांसोबत चर्चा: अनिल परब
Gopichand Padalkar | आमचा नाद चांगला आहे की पवारांचा हे कर्मचाऱ्यांना विचारा- गोपीचंद पडळकर