ST Bank : संस्थान खालसा… एसटी बँकेच्या 12 संचालकांचा तडकाफडकी राजीनामा; गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का

| Updated on: Dec 26, 2023 | 5:01 PM

एसटी बँकेच्या 12 संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने संस्थान खालसा झाले आहे. एसटी बँकेच्या 19 पैकी 12 संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या सर्व संचालकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलला सोडचिठ्ठी दिली आहे.

मुंबई, २६ डिसेंबर २०२३ : वकील गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. एसटी बँकेच्या 12 संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने संस्थान खालसा झाले आहे. एसटी बँकेच्या 19 पैकी 12 संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या सर्व संचालकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलला सोडचिठ्ठी दिली आहे. हे सर्व 12 संचालक एसटी बँकेत पोहोचले. यावेळी त्यांनी सोबत राजीनामेही आणले होते. या संचालकांनी एसटी महामंडळाचे अतिरिक्त संचालक बिमनवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलेत. त्यामुळे आता एसटी बँकेत पुन्हा एकदा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  एसटी बँकेत 450 कोटींचा घोटाळा झाल्याचा संचालकांचा आरोप आहे. त्यामुळे संचालकांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वीच 14 संचालक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर हे राजीनामे देण्यात आले आहे.

Published on: Dec 26, 2023 05:01 PM
इम्तियाज जलील यांना इंडिया आघाडीत यायची इच्छा? अंबादास दानवे म्हणाले, त्यांनी यावं…
डॉ. देवेंद्र फडणवीस… थेट परदेशातून गौरव, डॉक्टरेट पदवीनं DCM सन्मानित