गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी

| Updated on: Apr 15, 2022 | 1:45 PM

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte)  यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा चार दिवस पोलीस कोठडीत मुक्काम राहणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte)  यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा चार दिवस पोलीस कोठडीत मुक्काम राहणार आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना ही कोठडी सुनावली आहे. खासदार संभाजी छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2020मधील हे प्रकरण आहे. सातारा पोलिसांनी (satara police) सदावर्ते यांना या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं.

Published on: Apr 15, 2022 01:45 PM
नागपूर विभागात लालपरी धावायला सुरुवात, प्रवाशांचा वाढता प्रतिसाद
ठाकरे कुटुंबीय मनी लॉन्ड्रिंगसाठी चतुर्वेदीचा वापर करतायत का?, किरीट सोमय्यांचा सवाल