‘अरे वेड्या तुला काय माहीत, माझ्यामागे…’ , गुणरत्न सदावर्ते आणि आंनदराव अडसूळ आमने-सामने

| Updated on: Sep 11, 2023 | 6:38 PM

VIDEO | एसटी बँकेत सुरु असलेल्या कामावरुन शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचा वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गंभीर आरोप, आनंदराव अडसूळ यांनी केलेल्या आरोपावर सदावर्ते यांनी काय केला पलटवार?

मुंबई, ११ सप्टेंबर २०२३ | शिवसेनेचे नेते आंनदराव अडसूळ यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘गुणरत्न सदावर्ते हे बँकींग सेक्टरला कलंक आहे. सहकारी बँका बुडवायला निघालेत ते कुणाचंही ऐकत नाहीत, कर्मचाऱ्यांवर दमदाटी करत आहे’, असा गंभीर आरोप आनंदराव अडसूळ यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर केला. तर या आरोपांवर आता गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून प्रत्त्युत्तर देण्यात आलं आहे. ‘अडसूळ लबाड बोलू नकोस. अडसूळ वेड्या तुला काय माहीत, माझ्यामागे कधी ईडी लागली नाही. संचालकांचा एक रुपया खर्च होणार नाही. आनंदराव अडसूळ यांना दोन टर्म लोकांनी घरात बसवलं. ते बँकेला बदनाम करत आहेत’, असे सदावर्ते म्हणाले. तर बँकेचे प्रशासन अडसुळ यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Sep 11, 2023 06:38 PM
अन् साताऱ्यातील पुसेसावळी गावात दोन गटात संघर्ष, एकानं गमावला जीव; नेमकं काय घडलं?
‘…हे लिखित स्वरूपात द्या’, कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीचं उद्यापासून साखळी उपोषण