Gunratna Sadavarte | परबांनी दिलेल्या धमक्यांचं सत्र उच्च न्यायालयात वाचून दाखवण्यात येईल – सदावर्ते

| Updated on: Dec 14, 2021 | 8:20 PM

एसटी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते आक्रमक झालेत, त्यांनी राज्य सरकारच्या धमक्यांचा पाढा हायकोर्टात वाचून दाखणार असल्याचेही म्हटले आहे.

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते आक्रमक झालेत, त्यांनी राज्य सरकारच्या धमक्यांचा पाढा हायकोर्टात वाचून दाखणार असल्याचेही म्हटले आहे. संपावरील एसटी कर्मचाऱ्यांवर (St Employees Strike) कारवाई करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. निलंबित केलेल्या 10 हजार कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस देणार आहे. सेवेतून बडतर्फ का करू नये? यासाठी ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. या नोटीशीनंतर संपावरील कर्मचाऱ्यांना 8 दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. 20 तारखेला कोर्टाची तारीख आहे, त्यावेळी विलीनीकरणाचा निकाल लागेल,  तोपर्यंत कामावर या, असं आवाहनही परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी पुन्हा एकदा केले आहे.

Sanjay Raut | दिल्लीत सोनिया गांधींसोबत झालेल्या बैठकीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
Omicron | दिवसभरात महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 8 नवे रुग्ण सापडले