शरद पवार हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का? वकील गुणरत्न सदावर्तें यांची टीका
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याच्या अनुशंगानं एक महत्त्वाची बैठक आज सह्याद्री अतिथी गृहावर पार पडली.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याच्या अनुशंगानं एक महत्त्वाची बैठक आज सह्याद्री अतिथी गृहावर पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधींनी शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा केली. प्रदीर्घ चर्चेनंतर या बैठकीबाबतची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत एसटी कर्मचाऱ्यांना तातडीनं रुजू होण्याचं आवाहन वेगवेगळ्या एसी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी केलं. इतकंच काय तर यावेळी एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही निशाणा साधला.