राज ठाकरे यांची गुरू माँ कांचन गिरी यांनी घेतली भेट, काय झाली चर्चा?
... म्हणून गुरु माँ कांचन गिरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट, भेटीचं सांगितलं कारण
मुंबई : गुरु माँ कांचन गिरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या भेटीमागचे कारणही सांगितले आहे. राज ठाकरे यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली होती त्यामुळे मी आज त्यांची भेट घेतली. यावेळी मी त्यांची प्रकृती उत्तम रहावी, यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे राज ठाकरे यांचे विचार आहेत त्यांच्यात त्यांची प्रतिमा दिसते म्हणून त्यांची भेट घेतल्याचे गुरु माँ कांचन गिरी यांनी सांगितले. अयोध्येस राज ठाकरे लवकर जातील, आज निमंत्रण दिले आहे आता कोणतीही बाधा येणार नाही. प्रभू राम सर्वांचे आहेत. त्यांना आता कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले.
Published on: Feb 10, 2023 01:56 PM