Gyanvapi Masjid Case: वजूखान्यातच शिवलिंग सापडल्याचा हिंदू पक्षाचा दावा

| Updated on: May 18, 2022 | 4:45 PM

कोर्टाच्या आदेशानंतर अखेर ज्ञानवापी मशिदीतील वजूखाना बंद करण्यात आला आहे. नऊ टाळे लावून वजूखाना सील करण्यात आला आहे. तसेच या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे (crpf) देण्यात आली आहे.

कोर्टाच्या आदेशानंतर अखेर ज्ञानवापी मशिदीतील वजूखाना बंद करण्यात आला आहे. नऊ टाळे लावून वजूखाना सील करण्यात आला आहे. तसेच या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे (crpf) देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे वाराणासीतील (Varanasi) सरकारी वकिलांनी आज आणि 20 मे रोजी संप पुकारला आहे. त्यामुळे आज ज्ञानवापी प्रकरणावर वाराणासी कोर्टात सुनावणी होणार नाही. दरम्यान, मशिदीच्या वजूखान्याशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा दुसरा व्हिडिओ जुना असल्याचं सांगितलं जात आहे. आतापर्यंत या मशिदीशी संबंधित दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दोन्ही व्हिडीओ एक दोन महिने जुने असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र, वजूखान्यात सापडलेली दगडाची आकृती शिवलिंग आहे की फव्वारा आहे याचं रहस्य अद्यापही गुलदस्त्यात आहे.

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आग
ओबीसी राजकीय आरक्षणाची हत्या ही महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकारने केली- देवेंद्र फडणवीस