ज्ञानवापी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात, नव्या याचिकेवर मोठा निर्णय
ज्ञानवापी मशिदीत (Gyanvapi Masjid) सापडलेल्या कथित शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी मागणारी याचिका जलदगती न्यायालयात वर्ग करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीत (Gyanvapi Masjid) सापडलेल्या कथित शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी मागणारी याचिका जलदगती न्यायालयात वर्ग करण्यात आली आहे. आता त्यावर 30 मे रोजी सुनावणी होणार आहे. महेंद्र पांडे यांच्या फास्ट ट्रॅक कोर्टात (Fast Track Court) या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. आज वाराणसीच्या दिवाणी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. वास्तविक, हिंदू पक्षाने दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात ज्ञानवापी मशीद हिंदूंच्या ताब्यात देण्याची आणि पूजा करण्याची मागणी होती, त्यावर आज सुनावणी झाली. तर वाराणसी जिल्हा न्यायालयात (Varanasi District Court) सुरू असलेला ज्ञानवापी खटला हा दुसरा विषय आहे. त्यावर 26 मे रोजी म्हणजेच उद्या सुनावणी होणार आहे.