MPSC गट ब संयुक्त पुर्व परीक्षा 26 फेब्रुवारी रोजी; आजपासून हॉल तिकीट जारी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी गट ब 2020 ची पूर्व परीक्षा येत्या 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थांचे हॉल तिकीट आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी गट ब 2020 ची पूर्व परीक्षा येत्या 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थांचे हॉल तिकीट आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी आपले हॉल तिकीट वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच हॉल तिकीट डाऊनलोड करताना काही अडचण आल्यास टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा असे देखील आयोगाकडून सांगण्यात आले आहे.