Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा देशभक्तीपर गीत! पाहिलंत का?

| Updated on: Aug 04, 2022 | 11:42 AM

22 जुलै 1947 रोजी आपण तिरंग्याचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार केल्याचे देखील मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा देशभक्तीपर गीताचे प्रक्षेपण केलं जातंय.

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने देशभरात केंद्र सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव हा उपक्रम राबावण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आता याच पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस आपल्या घरांवर राष्ट्रध्वज (National Flag) फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांनी देशातील जनतेला केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत देशभरात येत्या 9 ऑगस्टपासून आठवडाभर ‘हर घर तिरंगा'(Har Ghar Tiranga) ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येकाने आपल्या घरावर तीन दिवस राष्ट्रध्वज फडकावा आणि ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला बळकटी द्यावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 22 जुलै 1947 रोजी आपण तिरंग्याचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार केल्याचे देखील मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा देशभक्तीपर गीताचे प्रक्षेपण केलं जातंय.

Published on: Aug 04, 2022 11:41 AM
Sanjay Raut: संजय राऊतांना आज कोर्टात हजर करणार, इडी कोठडी वाढणार की जामीन मिळणार याचा होणार निर्णय
राजकीय वर्तुळात खळबळ! “तिघांचे घ्या आणि चौथ्याला मतदान करा” आमदाराचं वक्तव्य