चांद्रयान -3 मोहिमेसाठी विठुरायाच्या पंढरीत हरिनामाचा गजर, विठ्ठलाला काय घातलं साकडं?

| Updated on: Aug 23, 2023 | 5:33 PM

VIDEO | पंढरीत चांद्रयान -3 मोहिमेसाठी साकडं, जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वारकऱ्यांनी चंद्रकोरीच्या आकाराप्रमाणे एकत्रित येत चंद्रभागेच्या पात्रात हरिनामाचा गजर एकत्रित येत केला

पंढरपूर, 23 ऑगस्ट 2023 | भारताच्या मून मिशनसाठीचा आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस असून आज भारताचं चांद्रयान-3 हे संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. त्यामुळे चंद्रयान 3 च्या लँडिंगसाठी अवघे काही तास उरले असून पुढील तासांमध्ये इस्त्रो ऐतिहासिक पाऊल टाकणार आहे. अशातच भारताची चंद्रयान तीन ही मोहीम यशस्वी होण्याकरता विठुरायाच्या पंढरीत हरिनामाचा जागर करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वारकऱ्यांनी चंद्रकोरीच्या आकाराप्रमाणे एकत्रित येत चंद्रभागेच्या पात्रात हरिनामाचा गजर एकत्रित येत केला आहे. चंद्रभागेची आरती आणि हरिनामाचा गजर करत भारताची चंद्रयान तीन मोहीम यशस्वी होण्याकरता श्री विठ्ठल आणि चंद्रभागेला वारकऱ्यांनी साकडे घातले आहे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नाला यश यावे आणि जगाच्या इतिहासात भारताचे नाव कोरले जावं याकरता पंढरित हरिनामाचा जागर केला जात आहे.

Published on: Aug 23, 2023 05:33 PM
Chandrayaan 3 Moon Landing : चांद्रयान-3 च लँडिंग तुम्ही इथे Live पाहा
लँडरकडून सकारात्मक संदेश आला तर…, चांद्रयान 3 मोहिमेबाबत भूशास्त्रज्ञ सुरेश चोपणे काय म्हणाले?