हरियाणात भाजप सर्वात मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो राज्याचा कल?

| Updated on: Oct 08, 2024 | 5:15 PM

Haryana Assembly Election Result 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप हा पक्ष आघाडीवर असून काँग्रेस हा पिछाडीवरच असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता पण नेमकं त्याच्या उलट पाहायला मिळालं.

Follow us on

हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज सकाळी ८ वाजेपासून समोर येत आहे. हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या निकालातील कलांमध्ये काँग्रेसने सकाळी आघाडी घेतली होती, मात्र तासाभरातच भाजपने जोरदार मुसंडी मारली आणि भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान ९० जागांवरचे कल समोर येताच हरियाणात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप हा पक्ष ५० जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, आता हरियाणामध्ये भाजप सत्तेची हॅट्रीक करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यावरूनच असे सांगितले जात आहे की, हरियाणात भाजप बहुमताने सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजप आणि काँग्रेसलाही या निवडणुकीत फायदा झाला आहे. भाजप सुरूवातीला ४० तर आता ५० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ३१ जागांवरून ३५ जागांवर पोहोचली आहे. या निवडणुकीत जननायक जनता पक्षाला मोठा फटका बसला आहे. १० जागांवर असलेली जेजेपी यंदा खातंही उघडू शकलेली नाही.